संपादक: मंगेश बन्सोड
कसारी (प्रतिनिधी) :
कसारी परिसरात अवैध रेती वाहतुकीविरुद्ध प्रशासनाने कारवाई करत रात्री उशिरा एका ट्रॅक्टरला जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून या भागात नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या रेती उपसा करून ती वाहतूक केली जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे येत होती.
या पार्श्वभूमीवर कसारी वनरक्षक करिश्मा जांभूळकर हे आपली जबाबदारी पार पाडत असता. २१ तारखेच्या रात्रो १० .१२ च्या दरम्यान, संशयास्पद हालचाल करणारा ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये अवैध रेती आढळून आली. संबंधित ट्रॅक्टर चालकाकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याचे उघड झाल्याने ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला.
प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामांवर कायमस्वरूपी आळा बसावा अशी मागणी केली आहे.





