ज्वाला न्यूज
गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली – भाजपाच्या सरकारने देशात पेट्रोल डिझेल व घरगुती ग्यॅसच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ केली या महागाईच्या काळात गोरगरीबाचे कबंरडे मोडले आहेत त्यामुळे सदरची भाववाढ कमी करावी या मागणीसाठी भारतिय कम्युनिस्ट पक्षातर्फ आज दि. १ जुन २०२६ ला शासनाचा निषेध नोंदविला व जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत महामहिम राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन पाठविण्यात आले.
सदर निषेध मोर्चाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला.
मागण्या
पेट्रोल डिझेल घरगुती ग्यॅसच्या वाढ झालेल्या किंमती कमी कराव्यात. जिवनाश्यक वस्तुच्या किंमती कमी कराव्यात. शेतीकरीता डिझेल बि बियाने औषधी सवलतीच्या दरात देण्यात यावे. विजेचे वाढविण्यात आलेले दर कमी करावे शेतकर्यांच्या सुपिक जमिनीचे बळजबरीने संपादन अधिग्रहण करू नये आदि मागण्याचे निवेदन देण्यात आले.
निषेध मोर्चात देवराव चवळे भाकप उपाध्यक्ष प्रकाश खोब्रागडे जिल्हा सहसचिव अँड. जगदिश मेश्राम चुन्नीलाल मोटघरे विजय लांजेवार प्रेमिला मने रेखा जांभुळे अल्का लाऊतकर मिरा उइके चंद्र -प्रभा रायपुरे प्रिती मडावी कविता चन्ने चौताली जांभुळकर सिमा नंदेश्वर आश्विनी ढेंभर्ण दुर्गा रणदिवे रुपाली ठेंभुर्ण कल्पना मडावी वैशाली तुलावी आदिसहीत भाकपचे बहुसंख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.





