पदविधर मतदार यादीचा , आमदार वंजारी यांचा गडचिरोली जिल्हा दौरा म्हणजे गुळध्याला बार्शीग बांधुन तयारच.
गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली. ज्वाला ‘ न्युज
गडचिरोली – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपत नाही तोच पद्विधर निवडणुकीचे वेध लागले असुन कांग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी सिरोंचा अहेरी भामरागड एटापल्ली या तालुक्यातील झंझावती दौरा सुरु केलेला आहे. त्यांचे सोबत कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे असुन पदविधर झालेल्या लोकांचे अर्ज भरून जास्तीत जास्त मतदार करण्याचा प्रयत्नात असुन ते प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व बैठका घेत आहेत.
पाच – सहा वर्षात विकासाचे कोणतेच काम न करता केवळ आमदार आडबले यांच्या सत्कार समारंभात हजर राहणारे तर विधानसभेत पदविधरांचे एकही प्रश्न उपस्थित केले नाही तसेच गडचिरोली जिल्हयातील शाळांना कमी अनुदान दिले त्यापेक्षा भाजपाचे माजी आमदार अनिल शोले यांनी आपल्या कार्यकाळात गडचिरोली जिल्हयाला भरपूर प्रेम देऊन अनेक शाळांना निधी दिली होती.होवू घातलेला निवडणुकीसाठी पुन्हा गुढध्याला बार्सीग बांधुन आमदार वंजारी संपुर्ण मतदार संघ पिंजुन काढत आहेत. भाजपाचे संभाव उमेदवार सुधाकर कोहळे यांनी यापूर्वीच अनेक ठिकाणी कार्यालय उघडून पदविधरांचे अर्ज भरण्यात आघाडीवर आहेत. पदवीधर मतदार संघातून एकदा निवडून आलेले आमदार पुन्हा आलेले नाहीत तरीही दोघेही आजी – माजी आमदार मलाच तिकीट भेटेल या आशेवर आहेत.
आमदार अभिजित वंजारी यांनी राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेऊन बंदद्वार चर्चा नुकतीच झाली. यात सदर मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आमदार धर्मराव बाबा आत्राम असल्याचे कळते. अनु.जाती जमाती मधे पदविधरांची संख्या जास्त आहेत अश्यातच बसपा , वंचित किंवा आरपीआयचा उमेदवार उभा राहीला तर पदवीधर मतदार संघाचे चित्र वेगळेच राहील. मागील निवडणुकीत RPI चे प्राचार्य देवेश कांबळे ब्रम्हपुरी यांनी भरपूर मते घेतली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कांग्रेसच्या आमदारांनी कांग्रेसच्या नगरसेवकांची मते कमी असल्याच्या कारणामुळे माघार घेतली होती.






