गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज
चंद्रपूर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा रविवार दिनांक १४ जुन २०२६ दुपारी १२ ते ५ पर्यत शासकिय विश्रामगृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे
कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर प्रदेश चे अध्यक्ष प्रकाशजी कुंभे हे असुन प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट् राज्य सचिव गोपाल रायपुरे नागपूर प्रदेश सरचिटणीस शिद्धार्थ सुमन महाराष्ट राज्य सचिव अशोक उमरे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी प्रमुख नंदाताई रामटेके हे राहणार आहेत.
सदर मेळाव्यात स्मृतिशेष नेताजी बुरचुंडे यांना श्रध्दाजंली देण्यात येणार आहे. तरी चंद्रपूर जिल्हातील सर्व रिपाई कार्यकर्त्यां त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे व जिल्हा महासचिव प्रा. रविंद्रनाथ पाटिल यांनी केलेले आहे.





