Homeगडचिरोलीशिवसेना प्रमुख ठेकेदाराचे काम राष्ट्रीय महामार्ग चौंडमपल्ली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे.

शिवसेना प्रमुख ठेकेदाराचे काम राष्ट्रीय महामार्ग चौंडमपल्ली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे.

.

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर मुख्य संपादक ज्वाला न्युज.

गडचिरोली – राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली ते आष्टी रोड गेल्या दोन वर्षापासुन सुरु असुन मोठ्या ठेकेदारांनी लहान कत्रांटदाराना दिलेले रोडचे काम निष्कृष्ठ दर्जाचे झाले असुन यावर कार्यकारी अभियंता व इंजिनिअर राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली यांचे दुर्लक्ष असुन उपमुख्यमंत्री च्या कार्यकर्त्याचे काम असल्यामुळे सदर प्रकार घडत आहे. चौडमपल्ली पासुन आलापल्ली कडे जाणारा १० कि.मी चा जंगलातील रस्ता पुर्ण झाला असुन सहा महिन्यानच रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत तर मध्यतरी डिव्हायडर साखरे उंच भाग दिसतात त्यावरून ट्रका’ व .फोरव्हिलर जाणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे होय.

जुन्याच रोडवर गिट्टी पसरवून डांबरीकरण केलेले आहे. सदर काही भागाचा रस्ता यापूर्वीच दलदलीचा होता त्यामुळे केलेले काम दबल्या गेले व मध्यंतरी उंचवटा सारखा रस्ता झालेला आहे तर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. विकासकामातील अनियमितता निकृष्ठ दर्जाचे काम यामुळे सदर रस्यावर अनेकदा अपघात घडलेले आहेत. सदर काम हे मोठ्या ठेकेदाराकडून मंत्र्यांच्या शिफारशीने शिवसेना प्रमुखांना देण्यात आलेले आहे त्यामुळे राष्टीय महामार्ग कार्यालय गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता व सदर रस्त्यावरील देखरेख करणारे अभियंते मुंग गिळून बसले आहेत. सार्वजनिक निधिच्या अपव्ययाची जबाबदारी निश्चित करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा गडचिरोली जिल्हयाचे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेली आहे.

 

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular