Homeनागपूरडॉ. अजय कंकडालवार यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात २० जुलै रोजी पुढील...

डॉ. अजय कंकडालवार यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात २० जुलै रोजी पुढील सुनावणी.

ज्वाला न्यूज 

नागपूर:

अहेरी (जि. गडचिरोली) येथील रहिवासी आणि सध्या कारागृहात असलेले डॉ. अजय रामय्या कंकडालवार यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर (BA/859/2026) आता २० जुलै २०२६ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून सध्या हे प्रकरण ‘प्री-अ‍ॅडमिशन’ (नोटीस उत्तरानंतरच्या) टप्प्यावर आहे. यापूर्वी 13 जुलै ला सुनावणी होणार होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अजय कंकडालवार यांच्याविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१(१) सह ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी कंकडालवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

१ जुलै २०२६ रोजी हा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, तर २ जुलै रोजी त्याची रीतसर नोंदणी करण्यात आली. यापूर्वी ३ जुलै २०२६ रोजी माननीय न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर यांच्या खंडपीठासमोर यावर प्राथमिक सुनावणी झाली होती. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. विश्वजीत सचिन सांबरे, अ‍ॅड. निखिल भैय्या कीर्तने आणि अ‍ॅड. गौरव एस. गौर हे काम पाहत असून, शासनाच्या वतीने सरकारी वकील (APP) बाजू मांडत आहेत.

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular