गडचिरोली – मुख्य संपादक: मुनिश्वर बोरकर
संपादक: मंगेश बन्सोड
छत्तीसगड – अनुसुचित जातीतील उपवर्गीकरणामुळे जाती – जाती मधे जातीवाद निर्माण होईल काही जातींतील अपात्र उमेदवार ठरवुन यांचा फायदा उच्च जातीच्या लोकांना होइल. अनषेश ३४१ नुसार उपवर्गीकरण करण्याचा अधिकार फक्त संसद आणि राष्ट्रपतीला असतो परंतु राज्य सरकार आपली मनमानी करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हे जर झाले तर आपले आरक्षण खत्म होईल हे हानुण पाळण्यासाठी एकजुट होऊन लढा देण्याची गरज आहे अश्या प्रकारचे मार्गदर्शन अँड. विनय बांबोळे यांनी औंधी ( छत्तीसगड ) येथे पार पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रसंगी केले.

छत्तीसगड ( औंधी ) येथे दि. २१ एपिलला आंबेडकर चौक औंधी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीचा कार्यक्रम जिल्हा पंचायत उपाध्यक्ष भोजेशजी मंडावी हे लाभले होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन अँड. विनय बाबोळे आरपीआय चे अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर सरपंच उसारे पुप्पा आत्राम धनराज बांबोळे जटाशंकर मिश्रा बौद्ध समाजाचे अध्यक्ष प्रा. कोमराज रामटेके राजेश मेश्राम समंदर तरुण शेन्डे आदिचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा एकत्र येऊन देण्याची गरज आहे. अध्यक्ष पदावरून भोजेस मडावी म्हणाले की जातीवाद न मानता जातीयवाद नष्ठ करणे आज काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष धनराज बांबोळे उपाध्यक्ष गोपाल बारसगडे सचिव सत्यवान वाकडे प्रदिप रामटेके महेंद शेन्डे नुर्पनाथ बोरकर योगराज मेश्राम आदिनी अथक परिश्रम घेतला कार्यक्रमास औधी क्षेत्रीय परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. 





