गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज
गडचिरोली – रुग्णालयात जात असणाऱ्या दुचाकीस्वार व्यक्तीस एका अवैध देशी विदेशी दारू वाहतुक करणारा रेनोलट काइगर कंपनीचे कार भरधाव वेगाने चालवून टु व्हिलर वाल्यांना धडक दिली दोन्ही गंभीर जखमी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती असुन आरोपी गाडी सोडून फरार आहेत.
सविस्तर घटना अशी की दिनांक ८ जुन ला प्रदीप परीमल मिश्रा वय २७ वर्ष राहणार लक्षीपुर तालुका मूलचेरा प्रदीप व त्याचा मित्र हरीश गोपाल सरकार हे दोघे येनापुर रूग्णालयात जात असताना त्याच मार्गाने विरूद्द दिशेने अवैद दारू वाहतुक करणारी भरधाव कारने रबींद्रपुर जवळच्या वळणावर प्रदीपच्या होंन्डा शाइन दूचाकीला जोरदार धडक दिल्याने प्रदीपचे एक पाय व दोन हात फॉक्चर झाले.अवैद देशी विदेशी दारू वाहतुक करणारे गोबींद हरेकृश्ण दास व जगदीश हरेकृश्ण दास रा २१४ नं ता मुलचेरा हे मुख्य आरोपी फरार आहेत दारू भरलेली कार आष्टी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलीआहे. सदर व्यकीचा आष्टी पोलीस शोध घेत आहेत मात्र गंभीर जखमी झालेले प्रदिप आणि हरिष दोघेही रुग्णालयात भरती आहेत. आष्टी पोलीसांना तारसा वरून मुलचेरा कडे अवैध दारू वाहतुक करणारे व्यक्ती व गाडी माहीत असुनही आरोपी फरार आहेत कारण आष्टी व मुलचेरा पोलिसांच्या आर्शिवादाने हे अवैध दारू चे धंदे सुरु आहेत.





