Homeनागपूरनागपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एका अधिकाऱ्याला ५०० रुपयांची लाच घेताना...

नागपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एका अधिकाऱ्याला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

नागपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एका अधिकाऱ्याला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई आज गुरुवारी दुपारी आरटीओ कार्यालयाच्या परिसरात करण्यात आली.या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयात कमिशन घेऊन काम करणाऱ्या दलालांनी पळ काढला आहे तर काही कर्मचाऱ्यांनी थेट कार्यालयातून काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली आहे. साजन शेंडे असे लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याचे नाव आहे.

 

तक्रारदार युवकांला वाहनाचेकागदपत्र देण्याच्या नावाखाली आरटीओ अधिकारी साजन शेंडे याने लाचेची मागणी केली. लाच न दिल्यास काम करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे तक्रारदार युवकाने थेट एसीबीमध्ये लेखी तक्रार केली. लाच घेण्याची तयारी दर्शविल्यामुळे एसीबी पथकाने आरटीओ कार्यालयातच सापळा रचला. दुपारी पाचशे रुपयांची लाच घेताच एसीबीने झडप घालून साजन शेंडेला ताब्यात घेतले. त्याने झटापट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली. एसीबीच्या एका पथकाने साजन शेंडेच्या घराची झडती घेतली. साजन शेंडे याने अनेक खासगी दलाल ठेवले होते. त्यांच्यामार्फत शेंडे लाच स्विकारत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पैसे कमविण्याच्या हेतून तो स्वत:च लाच घेऊन कामे करुन देत होता. त्याने पाचशे रुपयांची लाच घेतल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढण्यात येणार असून बँक स्टेटमेंटवरुन त्याने आणखी कुणाकडून लाच घेतली आहे का, याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular