गडचिरोली मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज
गडचिरोली – शासनाने दारिद्ररेषेखालील गोर गरीबांना शंभर रुपयात सबसिडी म्हणुन उज्चला गॅस सिलेडर वितरित केले होत सुरवातीला या योजनेद्वारे १२ सिलेंडर देण्यात आले नंतर ०९ तर आता फक्त ०४ म्हणजे तिन महिन्यातुन एकदाचं. अश्या परिस्थितीन उज्वला गॅस ग्राहकांनी संयपाक चुलीवर शिजवायची वेळ आली आहे.
चामोर्शी तालुक्यातील तळोधी मोकोस येथील महिला उज्वला गॅस सिलेंडरच्या नावाने बोट मोडत आहेत . गॅस पुरत नाही. जंगलव्याप्त जिल्हा असुनही वाघ आणि हत्तीच्या भितीमुळे व गार्ड च्या दंड आकारण्यामुळे आम्हाला सरपण आणता येत नाही. एक सिलेंडर तिन महिने पुरत नाही. शासनाच्या या फसव्या योजनामुळे उपाषी राहण्याची पाळी आलेली आहे तेव्हा शासनाने पूर्वीसारखे ९ गॅस सिलेंडर घ्यावेत अशी मागणी तळोधी – मोकासा येथील महिलांनी केलेली आहे. संपुर्ण गडचिरोली जिल्हयात हिच परिस्थिती आहे.





