ज्वाला न्यूज
गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज.
गडचिरोली – डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व ज्युपिटर हॉस्पीटल आणि आरोग्य दुत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ वर्षाच्या वयोगटातील मुलांची ह्दय रोग तपासणी व शस्त्रक्रिया दि. ५ जुलै २०२६ ला जिल्हा महिला रुग्णालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरी शिबिरात येऊन जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा अशी माहीती पत्रकार परिषदेला मंगेश चिवट ,गडचिरोली जिल्हा शिवसेना प्रमुख संदिप ठाकुर महिला आघाडी संर्पक प्रमुख डॉ. संगिता राऊत अमरावती यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील 0 ते १८ वयोगटातील मुलांनी ह्दय विकाराची मोफत तपासणी करून घ्यावी तपासणी दरम्यान ज्या रुग्णाला हदयाचा रोगाचा निदान झाल्यास त्यांना शस्त्रकियेसाठी योग्य सल्ला व संस्थेच्या वतीने सहकार्य करण्यात येइल असा काही धोका जाणवला तर त्यांना हदय विकाराची मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी सहकार्य करण्यात येइल अशी माहीत मंगेश चिवट यांनी दिली.
पत्रकार परिषदेला मंगेश चिवट गडचिरोली जिल्हा शिवसेना प्रमुख संदिप ठाकुर मदत केंद्र संर्पक प्रमुखअधिकारी सत्यपाल कुतरमार महिला आघाडी संर्पक प्रमुख डॉ. संगिता राऊत अमरावती संपर्क प्रमुख मनिष अग्रवाल जिल्हा प्रमुख ओमकार उपलवार आदि उपस्थित होते.





