Homeगडचिरोलीवैरागड-आरमोरी मार्गावर भीषण अपघात; ठाणेगावच्या व्यक्तीचा जागीच मृत्यूरुग्णवाहिकेच्या विलंबाने संतप्त नागरिकांचा संताप;...

वैरागड-आरमोरी मार्गावर भीषण अपघात; ठाणेगावच्या व्यक्तीचा जागीच मृत्यूरुग्णवाहिकेच्या विलंबाने संतप्त नागरिकांचा संताप; १०८ सेवेवर गंभीर आरोप 

संपादक मंगेश बन्सोड

आरमोरी/वैरागड:

वैरागड-आरमोरी मार्गावरील ‘हातमोड्या’ जवळ आताच झालेल्या भीषण अपघातात ठाणेगाव येथील ५० वर्षीय कर्मवीर भुरशे यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

 

आरमोरीहून येणाऱ्या बसला दुचाकी धारकाने धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

 

नेमकी घटना काय?

 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मवीर भुरशे (वय ५० वर्षे, रा. ठाणेगाव) हे वैरागडवरून आपल्या गावी ठाणेगावकडे दुचाकीने जात होते. दरम्यान, हातमोड्या ठिकाणाजवळ समोरून येणाऱ्या बसला दुचाकी धारकाणे जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, भुरशे यांचा जागीच मृत्यू झाला.

 

१०८ रुग्णवाहिकेवर नागरिकांचा रोष

 

या घटनेनंतर घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमीला तातडीने उपचार मिळावेत यासाठी उपस्थित नागरिकांनी तात्काळ ‘१०८’ या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेला वारंवार फोन केला. मात्र, या सेवेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही किंवा रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही, असा आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे.

 

“जर रुग्णवाहिका वेळेवर आली असती, तर कदाचित या व्यक्तीचे प्राण वाचले असते. प्रशासकीय अनास्थेमुळे एका निष्पाप व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे,” अशा तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.

 

परिसरात शोककळा

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे ठाणेगाव परिसरात आणि मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपत्कालीन सेवा सुधारण्याची मागणी आता जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular