Homeगडचिरोलीमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत मौशीखांब ग्रामपंचायतची पडताळणी समितीने केली पाहणी*

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत मौशीखांब ग्रामपंचायतची पडताळणी समितीने केली पाहणी*

संपादक मुनिश्वर बोरकर

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती राळेगाव समितीने ११/०५/२०२६ रोज सोमवारला गट ग्रामपंचायत मौशीखांबला भेट दिली अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांची तसेच दप्तरांची तपासणी समिती कडून करण्यात आली. पाहणी समितीत गटविकास अधिकारी पवार साहेब, शाखा अभियंता मुळे साहेब, विस्तार अधिकारी पंचायत म्हस्के साहेब, विस्तार अधिकारी पंचायत पोपडकर साहेब, ग्रामपंचायत अधिकारी भोयर साहेब, ग्रामपंचायत अधिकारी अमृतकर साहेब, यांनी पाहणी केली.व गडचिरोली पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी पंचायत देव्हारे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष श्री. कविश्वर बनपुरकर साहेब, निकुरे साहेब ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत मौशीखांबचे प्रशासक सौ. रंजिता डंबाजी पेंदाम, ग्रामपंचायत मौशीखांबचे ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे, ग्रामपंचायत मौशीखांबचे प्रशासकीय समिती सदस्य सौ. रुपाली गांधरवार, श्री. विकास उंदिरवाडे, श्री. जयकुमार खेडेकर, सौ. वर्षा तिवाडे, सौ. अंजना कुमरे, त.मु.गाव समिती मौशीखांबचे अध्यक्ष श्री. गणेश दहलकर, त.मु.गाव समिती उपाध्यक्ष श्री. लोभाजी हर्षे, श्री. संतोष चौधरी पो.पा. रानखेडा, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. पांडुरंग समर्थ. सर्व अंगणवाडी सेविका, अशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग कर्मचारी, उमेद अभियानातील सर्व ICRP, महिला बचत गटांतील महिला, पेसा मोबीलाईजर, मौशीखांब जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. आवारी सर तसेच मौजा मौशीखांब, बेलगाव, रानखेडा, मोहटोला येथील नागरिक उपस्थित होते. यावेळी सुशानयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध व स्वच्छ हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम आदि विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. समितीने ग्रामपंचायत कार्यालयासह, अंगणवाडी, शाळा, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन शेड, आरोग्य उपकेंद्र, अभ्यासिका, पशुवैद्यकीय दवाखाना, धार्मिक स्थळे, खुली व्यायामशाळा. भेट देऊन तेथील कामकाजाची तपासणी केली. विविध योजनांची अंमलबजावणी आणि गावातील विकास कामांची माहिती संकलित केल्यानंतर समितीने ग्रामपंचायत अंतर्गत गावांचे समाधानकारक व उल्लेखनीय काम असल्याचे सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पाहणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर ठाकरे, सुरेश कोलते, हेमंत मोंगरकर, प्रतिभा अलाम, यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular