Homeगडचिरोलीग्रामसेवक उमेश धोदरे यांच्या कथीत भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांचेवर गुन्हा दाखल करा....

ग्रामसेवक उमेश धोदरे यांच्या कथीत भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांचेवर गुन्हा दाखल करा. अशोक लांजेवार यांची मागणी.

ज्वाला न्यूज

गडचिरोली:

गडचिरोली – ग्रामपंचायत अधिकारी यु. दि. धोदरे हे धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत सावरगाव येथे कार्यरत असतांना त्यांनी केलेल्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तर सध्या ते मुलचेरा तालुक्यातील गोमणी ग्राम पंचायत येथे कार्यरत असुन तेथेही त्यांनी ५ – ६ लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे. तरी संबधित ग्रामसेवकाच्या दोन्ही ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. अशोक लांजेवार गडचिरोली यांनी केलेली आहे.

ग्रामपंचायत गोमणी मधे E पेमेन्ट मधे मोठी खळबळ केली असुन शासकिय निधिचा गैरवापर करणे सरपंच्यांना अंधारात ठेवून स्वतःच चेक ने पैसे काढणे बनावट कागदपत्र आदिची चौकशी केल्यास धोदरे यांच्या प्रचंड भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ शकतो. ग्रामपंचायत मधील नळ योजनेचे काम स्वतःच्या पत्नीला ठेकेदार बनवून बिल काढणे आदि कामाची चौकशी संबंधित अधिका-यांनी करावी तसेच त्यांचेकडे पाच – सहा ट्रका आहेत त्या कोठून आल्यात त्यांनी आतापर्यंतच् गळगंज संपत्ती जमविली असुन त्यांच्या घर बॅक खाते व मालमत्ता संपतीची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रा. अशोक लांजेवार यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular