गडचिरोली: मुनिश्वर बोरकर
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी बेकायदेशीरपणे बळकावल्या असून, त्या परत मिळवून देण्यासाठी आता शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा श्रीमती इंदिरा बोंदरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा पुकारण्यात आला आहे. या संदर्भात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
या बैठकीत बोलताना राजू कन्नाके यांनी इंदिरा बोंदरे यांच्या संघर्षाचा गौरव केला. ते म्हणाले की, “इंदिरा बोंदरे यांनी यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात आदिवासींच्या हक्कासाठी ऐतिहासिक पायदळ मोर्चा काढून मोठा संघर्ष केला आहे. त्यांची अनेक आंदोलने समाजमाध्यमांतून (सोशल मीडिया) संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहेत. त्यांच्या या अनुभवाचा आणि धडाडीचा फायदा आता गडचिरोली जिल्ह्यातील पीडित आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी होईल.”
रमेश मडावी आणि मंगला भगीरथ कन्नाके यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत, प्रशासकीय पातळीवर जमिनींच्या फेरफाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. ज्या बिगर आदिवासींनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या आहेत, त्यांना त्या जमिनी रिक्त कराव्या लागतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
बैठकीच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी “इंदिरा बोंदरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय रमेश मडावी आणि मंगला कन्नाके यांनी घेतला आहे.
आदिवासींच्या जमिनी परत मिळेपर्यंत हा संघर्ष शांत होणार नाही, असा ठाम निर्धार शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या वती.





