Homeगडचिरोलीवैचारिक जनजागृती कार्यक्रम , कही हम भूल न जाय !

वैचारिक जनजागृती कार्यक्रम , कही हम भूल न जाय !

संपादक मुनिश्वर बोरकर

गडचिरोली- “कहीं हम भूल न जायें” अभियानाद्वारे महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये “आंबेडकर मेळा ऑन व्हील्स” द्वारा वैचारिक जनजागृती कार्यक्रम नुकताच यशस्वीरित्या संपन्न झाला.

बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीसही जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी चळवळीप्रती जनजागृती निर्माण करण्याकरिता मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती (15 मार्च 2026) पासून सात टप्प्यांमध्ये “चालत्या फिरत्या आंबेडकर मेळ्याचे” (“आंबेडकर मेळा ऑन व्हील्स” चे) भव्य राज्यव्यापी जनजागृती अभियान यशस्वीरित्या संपन्न झाले आहे.

हे जनजागृती अभियान राबविताना विविध टप्प्यांमध्ये नागपूर, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अकोला, वाशिम, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, बीड, परभणी व हिंगोली ह्या 36 जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे 110 तहसील मध्ये पोहोचून महाराष्ट्रातील जनमाणसांमध्ये आंबेडकरवादी चळवळीप्रति जनजागृती निर्माण करण्यात आली.

या राज्यव्यापी उपक्रमादरम्यान 35 दिवसांमध्ये 7819 किलोमीटरचा प्रवास करीत 223 नुक्कड सभा तथा 32 जाहीर अश्या एकूण 255 सभा घेण्यात आल्या.

सदर मेळ्याचे समापन दीक्षाभूमी, नागपूर येथे 17 मे 2026 ला आठव्या बहुजन परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. या परिषदेस महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी आणि प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन “कहीं हम भूल न जायें” अभियानाचे ॲड. अतुल पाटील यांनी केले आहे

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular