Homeगडचिरोलीथोर समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभारे अनंतात विलीन.

थोर समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभारे अनंतात विलीन.

मुख्य संपादक: मुनिश्वर बोरकर

गडचिरोली – गडचिरोली जिल्हयाचे थोर समाजसेवक सेवाभावी व्यक्तीमत्व असलेले गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे वयाच्या ८० व्या वर्षी आज दिनांक २८ एप्रिलला सकाळी ११ वाजता अनंतात विलीन झाले.

त्यांचे पश्चात मुलगा डॉ. अनंता शिवनाथ कुंभारे सुन तीन मुली जावई नातवंड अशा बराच मोठा आप्त परिवार असुनआज सांयकाळी ६ वाजता कठाणी नदीघाटावर अंतसंस्कार करण्यात येइल असे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले.

डॉ. शिवनाथ कुंभारे हे मुळ आरमोरी येथील रहिवासी असुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचा घरी आले होते तेव्हापासुन ते डॉक्टरी पेशासोबत सेवाभावी वृत्ती बाळगुन समाजाची ,रंजल्या गाजल्याची सेवा करीत होते.ते सामान्य रुग्णालय इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे कार्यरत होते. पुढे त्यांनी आरमोरी बसस्टँड जवळ एका छोट्याशा खोलीत खाजगी दवाखाना चालवून रुग्णाला सेवा देत होते. पुढे चामोर्शी रोडवर दवाखाण्याची मोठी इमारत उभारून तिथे सुसंज्य दवाखाना उभारला आज त्यांचा मुलगा डॉ. अनंता दवाखाना चालवित आहे.

भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अण्णा हजारे राळेगांव यांच्या संर्पकात येऊन डॉक्टर साहेब भ्रष्टाचार निमुर्लनाचे काम करीत राहीले. तुकाराम दादा गिताचार्य अड्याळ टेकडी यांच्या सोबत अनेक वर्ष काम करून गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्षपद पद चांगल्या रितिने चालवून अनेक गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा निर्माण केल्या रामनगर येथील गुरुदेव सेवा मंडळात ते नेहमीच हजेरी लावत असत. पहाटे पासुन ८ वाजेपर्यत गुरुदेव सेवा मंडळात मार्गदर्शन भजन किर्तन ध्यान करायचे सकाळी ११ ते रात्रौ १० वाजेपर्यत दवाखान्यात रुग्णाची सेवा अगदी कमी फी घेऊन करायचे सांयकाळी कार्यक्रम असला तरी ते तिथेही हजर नक्षलग्रस्त आदिवासी भागात लोकसेवेच्या कामाकरीता जात असत वैद्यकिय सेवेसोबत समाजकार्य करता करता मागील दोन वर्षापासुन ते आजारी होते आज दि. २८ एप्रिलला त्यांचे निधन झाले आणि संपूर्ण गडचिरोली जिल्हात शोककळा पसरली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular