मुख्य संपादक: मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : छत्रपती शिवराय बचत गटाची वार्षीक बैठक दि. 26 एप्रिलला आभारे लॉन नवेगाव येथे बचत गटाचे अध्यक्ष दादाराव चुधरी यांचे अध्यक्षतेखाली तर बचत गटाचे सचिव रामकृष्ण ताजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सदर बैठकीत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुप्पहार अर्पण करण्यात आले तर बचत गटाचे सदस्य ग्रामसेवक दिलीप मेश्राम हे सेवानिवृत झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
बचत गटाचे अध्यक्ष दादाराव चुधरी यांनी वार्षीक अहवाल सादर करून छत्रपती शिवराय बचत गट संध्या प्रगतीपथावर असल्याचे सांगीतले. संचलन बचत गटाचे सचिव रामकृष्ण ताजणे यांनी तर आभार लडके सर यांनी मागले.
बैठकीला गोविंदराव बानबले डि.एन चापले शालिकराव विधाते प्रा. हेमंत रामटेके अँड. संजय ठाकरे प्रा. शेषराव येलेकर पि.पी. म्हस्के इजि. नागापूरे शरद पा. ब्राम्हणवाडे मोरांडे नरेंद्र पुसदेकर सहीत छत्रपती शिवराय बचत गटाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते





