Homeगडचिरोलीनवेगाव डम्पिंग यार्डच्या समस्येवर आजाद समाज पार्टी Action Mode मध्ये! दोषींवर...

नवेगाव डम्पिंग यार्डच्या समस्येवर आजाद समाज पार्टी Action Mode मध्ये! दोषींवर कारवाईची मागणी; प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

ज्वाला न्यूज

नवेगाव :नवेगाव येथील डम्पिंग यार्डमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजाद समाज पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. डम्पिंग यार्ड परिसरातील अस्वच्छता, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, नागरिकांना होणारा त्रास आणि संबंधित व्यवस्थेतील कथित अनियमितता याबाबत पक्षाकडून लवकरच ठोस भूमिका घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीकडून करण्यात येणार आहे.

 

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आजाद समाज पार्टी Action Mode मध्ये येऊन आंदोलन छेडणार, असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

 

दरम्यान, डम्पिंग यार्डच्या समस्येवर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे नवेगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular