Homeमहाराष्ट्र*शिक्षक भरतीला विलंब नको; विद्यार्थ्यांच्या हितासाठी TAIT-2025 ची भरती तातडीने पूर्ण करा* .

*शिक्षक भरतीला विलंब नको; विद्यार्थ्यांच्या हितासाठी TAIT-2025 ची भरती तातडीने पूर्ण करा* .

ज्वाला न्यूज

महाराष्ट्रात TAIT-2025 परीक्षा होऊन जवळपास १५ महिने उलटले आहेत. तरीही शिक्षक भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. राज्यातील हजारो पात्र उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत असून, दुसरीकडे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

 

*बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ (Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 – RTE Act)* नुसार प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. हा अधिकार प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनावर प्रत्येक शाळेत आवश्यक त्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रशासकीय प्रक्रियेपेक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित सर्वोच्च मानले गेले पाहिजे. म्हणून प्रथम विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी रिक्त पदांवर तातडीने नवीन शिक्षकांची भरती करणे अत्यावश्यक आहे.

 

सध्या काही कार्यरत शिक्षक संघटनांकडून आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न पुढे करून नवीन शिक्षक भरतीला विलंब लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरजिल्हा बदली हा शासनाचा स्वतंत्र प्रशासकीय विषय आहे. मात्र त्यासाठी नवीन शिक्षक भरती रोखणे किंवा विलंबित करणे योग्य ठरणार नाही.

 

प्रश्न असा उपस्थित होतो की, TAIT परीक्षा होऊन १५ महिने लोटले असताना या काळात संबंधित संघटनांनी सातत्याने हा प्रश्न का सोडवून घेतला नाही? आता भरती अंतिम टप्प्यात असताना त्यात अडथळे निर्माण करणे हे हजारो पात्र उमेदवारांवर तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे.

 

आज राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमित शिक्षक उपलब्ध नाहीत. वर्ग शिक्षकांविना सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शिक्षक भरती प्रक्रिया कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

आमची शासनाकडे मागणी आहे की,

 

TAIT-2025 शिक्षक भरतीसाठी प्रेफरन्स (Preference) प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी.

 

भरती प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव पुढे ढकलू नये.

 

रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची लवकरात लवकर नियुक्ती करावी.

 

आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न स्वतंत्रपणे सोडवावा; मात्र त्यासाठी नवीन भरतीला अडथळा निर्माण होऊ देऊ नये.

 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत.

 

 

> आमचा संघर्ष कोणत्याही शिक्षकांविरोधात नसून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आणि पात्र बेरोजगार उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी आहे. “शिक्षक नसलेले वर्ग नव्हे, तर प्रत्येक वर्गात शिक्षक हवा.” “विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा – TAIT-2025 शिक्षक भरती तात्काळ पूर्ण करा.” – शुभम पाटील TAIT-2025 पात्र शिक्षक भरती उमेदवार

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular