Homeचामोर्शीअल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ चामोर्शी बंद; न्यायासाठी जनआक्रोश उसळला.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ चामोर्शी बंद; न्यायासाठी जनआक्रोश उसळला.

ज्वाला न्यूज

चामोर्शी प्रतिनिधी;

चामोर्शी, ११ जून:

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात चामोर्शी शहरात आज बंद पाळण्यात आला. विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पीडितेला न्याय मिळावा, आरोपींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

 

लक्ष्मी गेट ते पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन प्रकरणाचा जलद तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

 

“पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण असून न्यायासाठीचा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular