Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा कांग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून तु .तु मै मै नाट्य सुरु ..

गडचिरोली जिल्हा कांग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून तु .तु मै मै नाट्य सुरु ..

 

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर संपादक

गडचिरोली – माजी राज्यमंत्री मारोतराव कोवासे याचे सुपुत्र उच्च शिक्षित एड. विश्वजित कोवासे यांची गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ति झाल्याबरोबर त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी अध्यक्ष बदलाबाबत कांग्रेसमधे ठिणगी

पडली असून अध्यक्ष पदावरून तु तु मै मै नाट्य सुरू झाले.

कांग्रेसचे जुने गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी चिमुर निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान व आरमोरी विधान सभेचे आमदार मसराम यांना निवडून आणण्याचे श्रेय कांग्रेसचे अध्यक्ष महेंद ब्राम्हणवाडे यांनाच जाते सोबतच अनेक आंदोलने मोर्चा व निदर्शने सुध्दा बाम्हणवाडे यांनी यशस्वी केले त्यामुळे चार वर्ष अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे महेंद्र बाम्हणवाडे हेच आमचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राहणार अशा कांगावा कांग्रेस मधील ओबिसी बांधव करीत आहेत.म्हणुन नविन अध्यक्ष विश्वजित कोवासे हटाव हि मोहिम कांग्रेसच्या एका नगरसेवकांनी पुढाकार घेऊन ज्यांनी निवडनुकीत गंल्यावर बसुन नागनाथ व सापनाथ ची भुमीका बजावली होती असे कांग्रेसचेच कार्यकर्ते म्हणायचे अश्यांनी कांग्रेसच्या १२ तालुका अध्यक्षांना बोलवून पत्रकार परिषदेत घेऊन कोवासे हटाव याकडे लक्ष वेधले असुन एक नगरसेवक त्यावरच थांबला नाही तर 26 मे ला संपुर्ण तालुका अध्यक्षाचे राजीनामे दिल्या जातील अशा अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे.

ओबिसीच्या प्रवर्गातील अध्यक्ष चार वर्ष सत्ता भोगुनही पुन्हा मीच अध्यक्ष म्हणतो मग आदिवासींनी काय करायचे ? कांग्रेसचे खासदार आमदार निवडून आणलो म्हणणारे नव्हे बाता मारणारे गडचिरोली विद्यानसभेचा कांग्रेसचा उमेदवार व नगर परिषद मधे बाजी का मारली नाही तेव्हा याच नागनाथ सापनाथानी भाजपाची हात मिळवणी केली तर नाही ना! असा सवाल आदिवासी नेते व बांधव दबक्या आवाजात करीत आहेत.

महत्वाची बाब अशी की पत्रकार परिषदेला ओबिसी बांधव एकवले होते ( आदिवासी बांधव एकही नव्हते ) व विश्वजित कोवासे हटाव असे नारे देत होते. एका नगरसेविकांनी तर आपल्या घरी थांटलेले कांग्रेसचे कार्यालय सुध्दा हटविले एवढा इगो आदिवासी अध्यक्षाचा का? असी विचारणा एका आदिवासी नेत्यांने आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना केली.

पर्याय –

गडचिरोली जिल्हा कांग्रेसच्या अध्यक्षांची धुरा ओबिसी व आदिवासी बांधवाकडे न देता कांग्रेसच्या दावनिला बांधलेले काही अनुसुचित जातीमधले हुशार लोक कांग्रेसमधे राबत आहेत यांचा विचार होइल काय ? कि ते कांग्रेसच्या चादरा बोथर्‍याच टाकण्याचे काम करतील ,कांग्रेस पक्ष श्रेष्ठीनी तसे ठरवावे परंतु तसे ओबिसीवाले होवू देणार नाही. यातुन्यच महिला कांग्रेसच्या अध्यक्षा अँड. कविता माहुरकर यांना नगराधक्ष पदाच्या विचार न करणारे हेच लोक होत ना ! यांच्यामुळेच अँड. माहुरकर ने कांग्रेसचा राजीनामा दिला व राष्टूवादी कांग्रेसचा दुप्पटा बांधला. उद्या गडचिरोली जिल्हा कांग्रेसचा अध्यक्ष कोवासे बदलला तर आदिवासी बांधव सुध्दा एकही कांग्रेसमधे राहणार नाही मग हे काँग्रेसवाले केवळ अनुसचित जातीच्या भरोसावर कांग्रेस चालव तील काय ? कारण अर्धे उभार ओबिसी व आदिवासी मतदार भाजपात आहेत हे विसरता कामा नये फक्त अनु . जातींचा मतदार जातीयवादी पक्षाकडे जात नाहीत हे कुण्या ज्योतिषांना सांगण्याची गरज नाही.

कांग्रेसचे आदिवासी आमदार खासदार – तुम लढो हम कपडे संभालते –

गडचिरोली जिल्ह्यात खासदार व एकआमदार आदिवासी प्रवर्गातुन निवडून आलेले आहेत ते मात्र या नाट्यावर बघ्यांची भुमीका बजावित आहेत. कांग्रेसचे मोठे नेते माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टिवार कोणती भुमीका घेतात याची वाट जनता पाहत आहे. एवढे मात्र खरे अश्या या तु तु मै मै नाट्यामुळे आधिच डुबलेली कांग्रेस पुन्हा रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र खरे …

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular