Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा ग्रामीण रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू.  रुग्णाच्या...

गडचिरोली जिल्हा ग्रामीण रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू.  रुग्णाच्या जीवाशी खेळ 

मंगेश बन्सोड गडचिरोली प्रतिनिधी

गडचिरोली:

गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेणारा रुग्णांना योग्य ती सोय न देता. त्यांच्या जीवनाशी खेळणं होत आहे.

मागील ४ ते ५ दिवसाअगोदर आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड ग्रामीण रुग्णालयात भेट देण्यासाठी गेले असता कॅज्युलटी ते वॉर्डातील जवळपास ६ AC बंद होते. यावर आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी म्हणाले होते की जर सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारा जिल्हाधिकारी रामभरोसे सोडत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करू असा इशाराही प्रश्नासनाला दिला होता.

 

त्यातच नवा प्रकार उघडकीस आला की, ११ मे ला व्हेंटिलेटर बंद पडल्याने नवजात बालकाचा मृत्यू? महिला व बाल रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

 

जिल्हा व महिला बाल रुग्णालयातील आरोग्य सेवेच्या गंभीर त्रुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला. वीज पुरवठा खंडित झाल्याने बॅकअपसाठी असलेला inverter बंद पडल्याने व्हेंटिलेटर थांबले. परिणामी एका नवजात बालकाचा मृत्यू झाला असा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील गैरवेवस्था आणि निष्काळजीपणा चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .

 

कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील संजना संदीप कुमरे (२३) यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर ११ मे रोजी महिला व बाल रुग्णालय दाखल करण्यात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी एका मुलाला जन्म दिला. पण काही तासांमध्ये बाळाची प्रकृती बिघडली दरम्यान

साडेसात तास लाईन नसणे हा नैसर्गिक दोष नसून रुग्णालयातील गैरसोय मुळे आलेली आपत्ती आहे ! त्यामुळे सदर पालकांना नुकसान भरपाई प्रशासनाने देऊन दोषीवर कारवाई करावी.

 

रुग्णालयातील गैरवेवस्था व निष्काळजीपणा मुळे नवजात बाळाचा जीव गेला.

 

वारवार होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील गैरव्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासन यांनी निष्काळजीपणा करून पुन्हा लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये. असा इशारा आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व संपादक ज्वाला News,अंधश्रधा निर्मूलन समितीचे तालुकासाचिव मंगेश बन्सोड यांनी दिला व भोंगळ कारभाराला किंवा गैरसोईला पुन्हा कोणाचा जीव जावू नये , जिल्हाधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशी विनंती केली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular