Homeनवेगाव बांधलाखो रुपयांच्या कामांत गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

लाखो रुपयांच्या कामांत गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

संपादक मंगेश बन्सोड

नवेगावबांध: नवेगाव बांध वनपरिक्षेत्र कार्यालयात माहितीच्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सदाशिव अवघान यांनी कामांतील कथित गैरव्यवहार लपवण्यासाठी जाणीवपूर्वक माहिती दडपल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय डोये यांनी केला आहे.

 

प्रकरण काय आहे?

१६ ऑक्टोबर २०२५ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय डोये यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत जांभळी, चात्रा/कोडका, गुढरी आणि इंजोरी येथील ‘चेलिंग फेन्सिंग’ व इतर कामांची माहिती मागितली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्याने केवळ गुढरी आणि इंजोरी येथीलच माहिती दिली, तर जांभळी व चात्रा/कोडका येथील माहिती देण्यास टाळाटाळ केली. यानंतर प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्याला संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशालाही केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

 

काय आहे आरोप?

सदाशिव अवघान यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी अपिलीय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात जांभळी व चात्रा/कोडका येथे कोणतेही काम झाले नसल्याचे नमूद केले होते. मात्र, प्रत्यक्षात ‘कॅम्पा’ (CAMPA) योजनेतून लाखो रुपये खर्च करून तेथे गवत लागवड व इतर विकासकामे झाल्याची माहिती समोर येत आहे. कागदोपत्री खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे वरिष्ठांच्या अभयाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती दडपली जाऊ शकत नाही, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. विजय डोये यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

@#

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular