Homeदेसाईगंजभरतनाट्यम् व भारतीय लोकनृत्य समारोपीय कार्यक्रम उत्साहात संपन्न.

भरतनाट्यम् व भारतीय लोकनृत्य समारोपीय कार्यक्रम उत्साहात संपन्न.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

देसाईगंज : छत्रपती शिवाजी क्लब, देसाईगंज तथा स्वर संगम सांस्कृतिक मंच, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भरतनाट्यम् व भारतीय लोकनृत्य प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हटवार मंगल कार्यालय, लाखांदुर रोड, देसाईगंज येथे उत्साहात पार पडला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रामदासजी मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत भारतीय कला, संस्कृती व लोकपरंपरा जतन करण्यासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम् व विविध भारतीय लोकनृत्यांच्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

 

या प्रसंगी देसाईगंज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. लताताई सौंदरकर, गटनेता विकास प्रधान, शिक्षण समिती सभापती बाळूभाऊ माडूरवार, धनपाल मिसार सर, दामोदर शिंगाडे सर तसेच प्रशिक्षण शिबिराचे गुरु श्री. किशोर हंपीहोळी व डॉ. सौ. किशोरी किशोर हंपीहोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे आयोजन वीरेंद्र मोहूर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमास पालक, नागरिक व कला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव करून कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular