थोटेबोडी च्या प्राथमिक शाळेत उन्हाळ्यातही शिक्षण सुरुच , आदर्श शाळा म्हणावे लागेल
गडचिरोली – आरमोरी तालुक्यातील थोटेबोडी जंगलाने वापलेले छोटस गांव थोटेबोडी ची प्रायमरी स्कुल बघीतली तर प्राथमिक शिक्षणाधिकारी ते मुख्य कार्यपालन अधिकारी पाहणी केल्यानंतर थक्क होतील अशी ही जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणावे लागेल.
योगायोगाने रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्रर बोरकर यांनी थोटेबोडी प्राथमिक शाळेला भेट दिली असता येथील मुख्याध्यापक नंदकिशोर मसराम चक्क भर उन्हातही विध्यार्थांना ज्ञानाचे धडे देत होते.
मागील तिन वर्षापूर्वी फक्त ७ विद्यार्थी असतांना मोडकळीस आलेली शासनाकडून बंद चा आदेश आलेली शाळा आज मुख्याध्यापक मसराम सराच्या अथक परिश्रमामुळे शाळेचा चेहरा – मोहराच बदलुन गेला. आज सदर शाळेत वर्ग १ ते ५ पर्यंत वर्गात ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तेही 24 hour शाळा सुरूच.
मुख्याध्यापक मसराम यांनी शाळेला लोकवर्गीतुन एक गाडी घेतली आहे यात निस्वार्थ सेवेने गाडी चालविणारा व्यकी झेंडेपार पिसवडधा आजुबाजुच्या विद्यार्थ्यांना नेण्या आणण्याची सेवा देतो शाळा ,शाळेतील गार्डन वाचनालय व संगित कार्यक्रमाची खोली मास्टर पॅन ने शिक्षण बघता कुणीही थक्क होइल बरेच विद्यार्थी अहोरात्र शिक्षण घेणारे. शासनाने थोटेबोडी प्राथमिक शाळेनेआरमोरी तालुक्यातुन दुसरा नंबर व जिल्हयात तिसरा नंबर पटकावला आहे. अशी ही थोटेबोडी आदर्श गावातील आदर्श शाळा शाळेतच घर थाटलेल्या मुख्याध्यापक मसराम ला गावातील लोकांचे सहकार्य लाभले आहे त्यामुळे सदर शाळा आज प्रगतीपथावर आहे.





