Homeगडचिरोलीतक्षशिला बुद्धविहार सालईटोली ( खरपुंडी ) येथे बुद्ध जयंती साजरी .

तक्षशिला बुद्धविहार सालईटोली ( खरपुंडी ) येथे बुद्ध जयंती साजरी .

संपादक मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली – तक्षशिला बुद्धविहार सालईटोली ( खरपुंडी ) येथे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा . मुनिश्वर बोरकर होते तर प्रमुख मार्गदर्शक बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व प्रेमलता कान्हेकर होते .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा . मुनिश्वर बोरकर म्हणाले की , बुध्दाच्या शांतीच्या मार्गाने चालल्यास युद्धाची गरज पडत नाही . कार्यक्रमाचे मार्गदर्शक बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर म्हणाले की , बुद्धाचा धम्म हा स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्यायावर आधारित आहे . जगाचा उद्धार बुद्ध धम्मानेच होईल . यावेळी प्रेमलता कान्हेकर , देवानंद सेमस्कर यांनी मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाचे संचालन विजय रामटेके यांनी केले तर आभार हेमंत बारसागडे यांनी मानले . खिरदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

या कार्यक्रमाला श्रावण शेंडे , देवानंद सेमस्कर, मुन्ना जांभुळकर , मुखरु सुखदेवे , मनोज खोब्रागडे , अमित मेश्राम, ज्ञानेश्वर घुटके , विवेक मेश्राम , गिरीष शेंडे , सुनिल वासानिक , सुधाकर बारसागडे , निघम शेंडे , उमेंद्र गोवर्धन , सुरेश वाळके , शामल मेश्राम , अभिला मेश्राम , गुड्डू खोब्रागडे , शषिकला मेश्राम , लता वासनिक , मिरा खोब्रागडे , माला बोरकर , उर्मिला रामटेके , मंजू मेश्राम , श्रृती घुटके , किरण अवधरे , सोनाली बारसागडे , सुशिला जांभुळकर , शिल्पा शेंडे , शाशिकला शेंडे ,शिला मेश्राम , सत्वधारा सुखदेवे , नांगाबाई अलोणे, नलीनी सेमस्कर, पल्लवी मेश्राम , सुषमा खोब्रागडे , काजल वाळके ,शितल रंगारी , शालीनी मेश्राम , वैशाली मेश्राम आदि उपासक व उपासिका उपस्थित होते .

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular