संपादक मंगेश बन्सोड
भारतीय हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील २४ तास तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही भागांमध्ये रात्रीही उष्ण वातावरण कायम राहण्याची दाट शक्यता आहे.
सध्या विदर्भात तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात असून ब्रह्मपुरी, वर्धा, अमरावती आणि नागपूर परिसरात उष्णतेची तीव्रता अधिक वाढली आहे.
नागरिकांनी दुपारी १२ ते ४ दरम्यान अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके व सूती कपडे वापरणे तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





