Homeगडचिरोलीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून बदली करा...

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून बदली करा अन्यता बेमुदत ठिय्या आंदोलन करू. समाज सेविकाअमिता मडावी .

ज्वाला न्यूज

गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर

गडचिरोली – जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या भ्रष्टाचारांची चौकशी करून त्यांची बदली करा अन्यता ७ ऑगष्ट २०२६ पासुन उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय नागपूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येइल अशा ईशारा सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी प. सं सदस्य अमिता शामकांन्त मडावी यांनी दिलेला आहे.

अहेरी येथील सामान्य बाल रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी सि.एस डॉ. लहाडे यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामे दिलेत. सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे घाणीचे साम्राज्य असुन लक्ष न देणे सामान्य रुग्णालयात सुरक्षारक्षक कमी असतांना सुद्धा आपल्या बंगल्यावर तिन – तिन सुरक्षारक्षक ठेवणे. डॉ. लहाडे यांनी अनेक नियमबाह्य कामे केलीत त्यांची चौकशी करण्यात यावी यांच्या कार्यकाळात औषधी घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजला यांची चौकशी होणे गरजेचे आहे.

डॉ. लहाडे ह्या नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असतांना त्यांचा कथीत भ्रष्टाचार प्रकरणी येथील नागरिकांनी आंदोलन करून बदली केली आता तिच वेळ गडचिरोलीकरावर आलेली आहे. दिव्यांगांचे ऑफीस हालवून त्यांना नाहाक त्रास देणे आपल्या मर्जीतील डॉक्टरांना चांगली वागणुक देणे व इतरांकडे दुर्लक्ष करणे. काही आरोग्य अधिकारी आपल्या संस्था काढून नर्सिग कॉलेज मध्ये बोगस आणि नियमबाह्य कामांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे ,डॉ. लहाडे यांच्या कथीत भ्रष्टाचार प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता या धर्तीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी अन्यता आमरण उपोषणाचा ईशारा सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी यांनी राज्याचे मुख्यमंत्री , गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक मंत्री तसेच कांग्रेसचे नेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केलेली आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular