Homeगडचिरोलीआश्रमशाळातील त्या ५९७ कंत्राटी शिक्षकांची पुनश्च नियुक्ती !

आश्रमशाळातील त्या ५९७ कंत्राटी शिक्षकांची पुनश्च नियुक्ती !

ज्वाला न्यूज

गडचिरोली प्रा. मुनिश्वर बोरकर मुख्य संपादक ज्वाला न्युज

गडचिरोली – राज्यातील सर्व आश्रम शाळेतील कात्रांटी कर्मचार्‍यावर टांगती तलवार होती तुटपुज्या मानधानावर सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचार्यांना आदिवासी विकास विभाग कडे दरवर्षी पुन्हा शाळेवर घेणार की नाही कधि घेणार यावर विचार करीत बसण्याची पाळी येत होती परंतु शिक्षकांच्या न्यायालयीन संघर्षानंतर मात्र आदिवासी विकास विभागाने एक पाऊल मागे घेत अखेर उच्च न्यायालयाच्या मॅट अंतिम आदेशाने त्या ५९७ शिक्षकांना शाळेवर रुजु करून घेणे भाग पाडले.

शासनाने आश्रम शाळेतील शिक्षकांची नविन भरती करण्याच्या हालचाली सुरु असतांना कंत्राटी शिक्षक कर्मचारी न्यायालयात ( मॅट ) मधे गेले होते. तुटपुंज्या मानधानावर आम्ही सेवा देऊन आमचे कुटुंब चालवित होतो आता आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्यातही कला व क्रिडा विध्यार्थांचे नुकसान होईल तेव्हा न्यायालयाने या बाबीचा विचार करता कत्रांटी शिक्षकांच्या बाजुनी न्याय दिला व कंत्राटी शिक्षकांना दिलासा मिळाला.

कंत्राटी शिक्षकांचे होणार मुल्यांकन – अट

न्यायालयांनी जरी कत्रांटी शिक्षकांना पुन्हा शाळेवर घेण्याचे शासनाने ठरविले असले तरी मागील वर्षात सदर शिक्षकांची कामगिरी तपासुनच जिल्हाधिकारी मार्फत एक समिती गठीत करून त्या शिक्षकांचे मुल्यांकन करून त्यांना नियुक्ती आदेश देण्याची अट शासनाने घातली आहे. मंजुर असलेल्या १४९७ शिक्षकापैकी ५९७ शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळणार असुन उर्वरित ९०० पदे रिक्त ठेवणार की काय उर्वरीत अश्या शिक्षकांचे भवितव्य अंधारातच राहणार की काय अशी भिती कत्रांटी शिक्षकांना पडली आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular