Homeगडचिरोलीगडचिरोली येथे भव्य शेतकरी मेळावा व काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात.

गडचिरोली येथे भव्य शेतकरी मेळावा व काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात.

संपादक मंगेश बन्सोड

गडचिरोली : येथे आयोजित करण्यात आलेला भव्य शेतकरी मेळावा तसेच काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेले विश्वजित कोवासे यांच्या पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी आमदार श्री रामदासजी मसराम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विश्वजित कोवासे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकरी मेळाव्यात सहभागी होत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

 

कार्यक्रमात शेतकरी हिताचे विविध विषय, शेतीसमोरील आव्हाने तसेच संघटन बळकटीकरणावर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याची भूमिका व्यक्त केली.

 

या प्रसंगी उपस्थित माजी विरोधी पक्ष नेते तथा गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार, प्रदेश सचिव कुणाल चौधरी, भारतीय राष्ट्रीय सचिव अजय चीकारा, आमदार अभिजीत वंजारी, प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस वसंतराव पुरके, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार देवराव भांडेकर,जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, माजी जी.प. अध्यक्ष अजय कंकडलवार, पंकज गुडेवार, रामभाऊ मेश्राम, बंडू शनिवारे, रवींद्र दरेकर, प्रकाश भाऊ इटनकर, हनुमंत मडावी, वामनराव सावसागडे, समशेर खा पठाण, नगरसेवक राजूभाऊ राशेकर, नगरसेवक विकास प्रधान, नगरसेवक श्याम उईके व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular