Homeकुरखेडाकुरखेडा येथे आधुनिक क्रीडा संकुल उभारणीसाठी हालचाली वेगात. आमदार रामदास मसराम यांचा...

कुरखेडा येथे आधुनिक क्रीडा संकुल उभारणीसाठी हालचाली वेगात. आमदार रामदास मसराम यांचा पुढाकार !

 

कुरखेडा, दि. ४ : कुरखेडा शहरात आधुनिक सुविधांनी युक्त क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने तहसीलदार कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री रामदासजी मसराम यांच्या पुढाकारातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.

 

या बैठकीत क्रीडा संकुलासाठी योग्य जागेची निवड, आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशासकीय प्रक्रिया तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी तळेगाव रोड परिसरातील संभाव्य जागेची प्रत्यक्ष पाहणी करून क्रीडा संकुल उभारणीसाठी त्या ठिकाणाची उपयुक्तता तपासली. यावेळी उपलब्ध जागा, वाहतूक सुविधा, खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा तसेच भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

 

यावेळी तहसीलदार शशिकांत जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घाटाळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, वनपरिक्षेत्र अधिकारी कोपुलवार, नायब तहसीलदार धनबाते, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी सभापती गिरीधर तितराम, मंडळ अधिकारी नवले,तलाठी ठाकरे तसेच इतर संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

आमदार श्री रामदासजी मसराम यांनी ग्रामीण भागातील युवक-युवतींना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत या दृष्टीने क्रीडा संकुल उभारणीचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. प्रस्तावित क्रीडा संकुलामुळे कुरखेडा तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular