Homeकुरखेडाआंवान हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना श्री. लीलाधर भरडकर यांच्याकडून मोफत स्पोर्ट्स शूजचे वाटप.

आंवान हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना श्री. लीलाधर भरडकर यांच्याकडून मोफत स्पोर्ट्स शूजचे वाटप.

ज्वाला न्यूज 

आंधळी : बहुजन हिताय शिक्षण संस्था, कुरखेडा द्वारा संचालित आंवान हायस्कूल, आंधळी फाटा येथे विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स शूज वितरण कार्यक्रम शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता उत्साहात पार पडला. गडचिरोली नगर परिषदेचे सभापती तथा गडचिरोली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. लीलाधर भरडकर यांनी स्वतःच्या खर्चातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स शूजचे वाटप केले.

 

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने श्री. भरडकर यांनी हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी कौतुक केले.

 

यावेळी बहुजन हिताय शिक्षण संस्थेचे सचिव श्री. कृपाल मेश्राम यांनी संस्थेच्या वतीने श्री. लीलाधर भरडकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही संधी मिळणे आवश्यक असून, त्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी श्री. भरडकर यांनी दाखविलेली दानशूर वृत्ती व सामाजिक बांधिलकी ही समाजातील इतर व्यक्तींनाही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा देणारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

कार्यक्रमाला पालक श्री. भोला पठाण, श्री. ठलाल, तसेच शाळेतील शिक्षक श्री. सोनवणे सर, श्री. के. सी. मेश्राम, श्री. म्हस्के सर, सौ. वालदे मॅडम, नरेंद्र कोसे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांना मिळालेले प्रोत्साहन हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular