गडचिरोली – मुनिश्वर बोरकर
घोट – स्वामी विवेकानंद नर्सिंग ट्रेनिंग घोटच्या वतीने घोट येथील नर्सिंग ट्रेनिंग करणाऱ्या मुलींना त्या पास झाल्याचा डिप्लोमा (प्रमाणपत्र ) संस्थेचा वतीने माहीती अधिकार च्या महिला जिल्हाध्यक्ष रुम्पा शहा घोट यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यात रमा कुंदु गणेश सरकार करिष्मा सरकार बबीता शहा रजिता कुंदु यांना डिप्लोमा देण्यात आले.
ज्या विध्यार्थिनींना डिप्लोमा प्राप्त झाला अश्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहुन आपला व्यवसाय सुरु करावा किंवा कोणत्याही डॉक्टरकडे जावून नोकरी करावी असे रुप्मा शहा घोट यांनी डिप्लोमा धारक विद्यार्थीनींना मार्गदर्शक केले. याप्रंसगी पत्रकार हेमंत उपाध्य तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिनकर लाकडे पांडुरंग कामरे प्रामुख्याने उपस्थित होते.





