Homeकुरखेडाकुरखेड्यात सरपंच संघटनेच्या आंदोलनाला नवे वळण! बेमुदत उपोषणानंतर...

कुरखेड्यात सरपंच संघटनेच्या आंदोलनाला नवे वळण! बेमुदत उपोषणानंतर आता बुधवारपासून आमरण उपोषणाचा इशारा; मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही.

कुरखेडा | ज्वाला न्यूज

कुरखेडा पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी D.B. उराडे यांना तात्काळ हटविण्याकरिता सरपंच संघटनेच्या वतीने ४ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आता नवे वळण मिळाले आहे. प्रशासनाकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास बुधवारपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार सरपंच संघटनेने व्यक्त केला आहे.

 

“जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही,” अशी भूमिका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

दीर्घकाळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे कुरखेडा पंचायत प्रशासनातही वातावरण तापले असून, आता प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडूनही पाठिंबा मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

मागण्या मान्य होणार की आंदोलन अधिक तीव्र होणार?

याकडे कुरखेडा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular