Homeकुरखेडाआंचिव हायस्कूल चिखली येथे विद्यार्थिनींना सायकल वितरण .

आंचिव हायस्कूल चिखली येथे विद्यार्थिनींना सायकल वितरण .

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

कुरखेडा:

आंचिव हायस्कूल, चिखली येथे 03 जून 2026  “खनिज कर्म” योजनेअंतर्गत इयत्ता 8 वीच्या विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण 7 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज डाहाळे होते. यावेळी सहाय्यक शिक्षक श्री. मुंगमोडे, श्री. मरस्कोल्हे, कु. तृप्ती राखडे, कु. अस्मिता भैसारे, श्री. दहिवले, श्री. मेश्राम, मडावी मॅडम उपस्थित होते.

 

तसेच पालक प्रतिनिधी श्री. उमेश उपराडे, श्री. धनंजय जणबंधू, उलसीबाई हारामी, कविता राऊत, जयमाला बावणे, अनमोल बहेटवार यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करणे अधिक सोयीचे होणार असून त्यांच्या शिक्षणाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular