संपादक मंगेश बन्सोड
एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे आहे. सदर व्यक्ती अंगाने मजबूत, उंची अंदाजे ५ फूट ५ इंच, रंग निमगोरा व चेहरा गोल आहे. मृत व्यक्तीने अंगावर विटकरी रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट, काळ्या रंगाची फुल पँट, पांढऱ्या रंगाचे बनियन तसेच निळे पट्टे असलेले अंडरवेअर परिधान केले होते.
सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, मृताच्या नातेवाईकांनी किंवा ओळख पटवू शकणाऱ्या नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
📞 संपर्क :
पोलीस निरीक्षक नारायण देशमुख – मो. ९१९४२३६३३३
पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे – मो. ८५३०२९५०३५
पोलीस शिपाई प्रतीक गरुड – मो. ७७०९६३०३०९





