ज्वाला न्यूज
कुरखेडा:
मौजा बादबदा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली येथे आज ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व जोमाने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक, महिला तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला ग्रामसभा अध्यक्ष श्री. सादाराम काटेंगे, गावपुंजरी श्री. सुरेश कुमरे, तसेच श्री. मनकरशाह कोरेटी, श्री. बालसिंग कोरेटी, श्री. माणिक पुडो, श्री. राजेश हलामी, श्री. विकास कुमरे, श्री. भजन हुर्रा, श्री. रमेश कुमरे, श्री. धीनिराम पुडो व श्री. काशीराम काटेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चेतन काटेंगे, आजाद समाज पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा जनजाती विकास परिषद, नई दिल्ली तालुका अध्यक्ष, कुरखेडा उपस्थित होते.
यावेळी आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती, हक्क, जल-जंगल-जमीन आणि सामाजिक एकतेचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी समाजाने आपली संस्कृती व परंपरा जपत शिक्षण, सामाजिक विकास आणि संघटनात्मक एकतेच्या माध्यमातून पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात संपूर्ण गावातील नागरिक, महिला व बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे बादबदा येथे जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.





