Homeगडचिरोलीदेऊळगाव येथे एका घरात 9.30 लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त.

देऊळगाव येथे एका घरात 9.30 लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त.

संपादक: मंगेश बन्सोड

 

 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधक संबंधित तंबाखूच्या काळाबाजार दिवसेंदिच फोफावत असल्याचा धक्कादायक वास्तव्य पुन्हा समोर आल्यात आरमोरी पोलिसांनी अचूक गुप्त माहितीच्या आधारे देऊळगाव येथे कारवाई करत तब्बल ९ लाख ३० हजार ९९० रुपयाचा सुगंधित तंबाखू व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी गोपाल हरिराम निंबेकर वय (३९) वर्ष व यशवंत विठ्ठल हर्षे (४०) वर्षे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यांच्या घरातून हा अवैध व्यवसाय सुरू असल्यास उघड झाले. पोलीस सूत्रानुसार दिनांक १८ एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती नंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थित आरोपीच्या घरावर छापा टाकला यावेळी घरात तसेच बाहेर उभे असलेल्या मारुती वॅगनार

(MH 33 AC 6256) वाहनांची तपासणी केली असता. विविध ब्रँडचे हुक्का सिसा तंबाखू पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला छाप्यात होल्ला ,हुक्का, इगल मध्ये 108 विमल पान मसाला यांसारखे उत्पादनांच्या शेकडो पाऊस टिन बॉक्स व पॅकेट जप्त करण्यात आले. तसेच तंबाखू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन मोबाईल फोन व इतर साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अन्नसुरक्षा व माहिती कायदा 2006 अंतर्गत विविध कलमा नवे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश अपर पोलिस अधीक्षक गोपाल राज, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हेरडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वात पार पडली. आरमोरीत घराघरातूनच अवैध तंबाखूचा व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट होत असून पोलिसांनी अशा माफीयांवर विरोधात आणखी कठोर करावयाचे संकेत दिले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular