Homeचामोर्शीचामोर्शी क्षेत्रातील वाळू माफियांना नेमका कुणाचा आशीर्वाद?

चामोर्शी क्षेत्रातील वाळू माफियांना नेमका कुणाचा आशीर्वाद?

ज्वाला न्यूज 

चामोर्शी, दि. 24 सप्टेंबर 

कोट्यवधी रुपयांच्या महसुली लुटीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप.

 

आझाद समाज पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा

चामोर्शी क्षेत्रातील वाळू उपसा व वाहतुकीच्या प्रकरणावरून आझाद समाज पार्टीने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी असून, यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

 

वाळू उपसा व वाहतुकीवर प्रशासनाकडून कारवाई होत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थितीमध्ये अपेक्षित बदल का दिसून येत नाही, असा सवाल आझाद समाज पार्टीने उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकारामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे आणि संबंधित यंत्रणा कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे? याची चौकशी करण्याची मागणी पक्षाने केली आहे.

 

शासकीय महसुलाचे नुकसान, नदीपात्राचे होणारे नुकसान तसेच स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करावी. वाळू उपसा व वाहतुकीसंदर्भातील परवानग्या, रॉयल्टी, वाहतूक पास आणि संबंधित व्यवहारांची निष्पक्ष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

“प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई करावी. अन्यथा आझाद समाज पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा आझाद समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांनी दिला आहे.

 

प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा पुढील आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular