गडचिरोली संपादक मंगेश बन्सोड
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यात डिझेल टंचाई आणि काळाबाजाराचा गंभीर प्रकार समोर येत असल्याची चर्चा रंगली आहे. चामोर्शी परिसरातील एका पेट्रोल पंपावर एका दिवसात तब्बल 27 हजार लिटर डिझेल विक्री झाल्याची माहिती समोर आली असून, हे डिझेल उद्योगांना पुरवले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सामान्य वाहनचालक रांगेत उभे असताना उद्योगांना डिझेल पुरवठा करण्यासाठी प्रती लिटर 90 रुपयांऐवजी 110 रुपये दर आकारले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जिल्ह्यात अनेक दिवसांपासून डिझेल तुटवड्याची समस्या कायम असताना काही ऑपरेटर आणि उद्योगांना मात्र जादा दराने डिझेल पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाकडे संपूर्ण विक्रीची आकडेवारी उपलब्ध असूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून संपूर्ण चौकशीची मागणी जोर धरत आहे.





