HomeUncategorizedगडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून एम. रमेश यांची नियुक्ती तर निलोत्पल यांची...

गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून एम. रमेश यांची नियुक्ती तर निलोत्पल यांची बदली.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त करण्यात महत्वाची भूमिका आणि विकास प्रक्रियेत अत्यंत महत्वपूर्ण योगदान देणारे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची बदली झाली असून , त्यांच्या जागी जिल्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक एम. रमेश यांची नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या गृह विभागाने नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले असून निलोत्पल आता कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदाची धुरा सांभाळणार आहेत.

 

माओवाद्यांविरोधात अनेक अभियान यशस्वीपणे पूर्ण करणारे, भूपती व इतर जहाल माओवादी नेत्यांसह अनेक माओवाद्यांना सरकारपुढे शरण आणणारे नीलोत्पल गडचिरोलीत आपल्या शांत स्वभावासाठी व धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध झाले. त्यांच्याच कार्यकाळात अपर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत एम. रमेश आता गडचिरोलीचे नवे पोलिस अधीक्षक झाले आहेत.

 

त्यांनीही अनेक माओवादविरोधी मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून त्यांचीही गडचिरोलीची कारकिर्द यशस्वी राहिल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. माओवाद्यांना जवळ-जवळ संपुष्टात आणणारे नीलोत्पल यांची कारकिर्द गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल हे निश्चित.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular