Homeभामरागडशिक्षक दारूच्या नशेत शाळेत येतात?; ग्रामस्थांनी मांडल्या गंभीर समस्या.

शिक्षक दारूच्या नशेत शाळेत येतात?; ग्रामस्थांनी मांडल्या गंभीर समस्या.

ज्वाला न्यूज 

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील ताडगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील समस्यांबाबत ग्रामस्थांनी गंभीर तक्रारी मांडल्या आहेत. ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी सौजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शाळेला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी शाळेतील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.

 

ताडगाव केंद्र शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून सुमारे २० विद्यार्थी आणि तीन शिक्षक आहेत. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा नसून वीज आणि पंख्यांचीही व्यवस्था नाही. स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असून मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्याची बाबही समोर आली आहे.

 

शिक्षकांच्या वर्तनाबाबत ग्रामस्थांची तक्रार

यावेळी एका शिक्षकाबाबत दारूच्या नशेत शाळेत येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी अभिजीत दीपके यांच्याकडे केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांच्या वर्तनाबाबतच प्रश्न निर्माण होत असतील, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

 

शाळेची इमारतही जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. त्याच परिसरात पोषण आहार तयार केला जात असल्याची बाबही ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.

 

पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा मुद्दा

पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अल्प रोजंदारीचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. एवढ्या कमी मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित करत मानधन वाढविण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रत्येक शाळेत स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

 

शाळांमध्ये उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर होत आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

या दौऱ्यात निदर्शनास आलेल्या समस्या सरकारच्या निदर्शनास आणून देऊ. सुधारणा झाली नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठे आंदोलन उभारू, असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular