Homeगडचिरोलीगडचिरोलीतील रस्ते-पुलांच्या गुणवत्तेवर तडजोड नको.

गडचिरोलीतील रस्ते-पुलांच्या गुणवत्तेवर तडजोड नको.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड 

गडचिरोली, दि. २७ ऑगस्ट : जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे दर्जेदार, सुरक्षित आणि टिकाऊ झाली पाहिजेत. निकृष्ट काम आढळल्यास चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले यांनी दिला.

 

जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र ‘विशेष पॅकेज’ मागण्यात येणार आहे.

 

AIIB अंतर्गत २७७.६० किमीच्या सहा रस्त्यांसाठी २,७५२ कोटींचे प्रस्ताव, तर सुमारे ४९२ कोटींच्या मायनिंग कॉरिडॉर कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मंत्री भोंसले यांनी सांगितले.

 

त्यानंतर त्यांनी कोनसरी प्रकल्प व चामोर्शी–हरणघाट रस्त्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular