ज्वाला न्यूज
गडचिरोली : सर्पदंशाने गंभीररीत्या पीडित असलेल्या ११ वर्षीय दीपिका मडावी हिने तब्बल ४ ते ५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर मृत्यूवर मात केली. नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून, ती पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला तिच्या मूळ गावी केहकावाही, जिल्हा गडचिरोली येथे सुरक्षितपणे परत सोडण्यात आले.
दीपिकाला सर्पदंश झाल्यानंतर तिची प्रकृती गंभीर होती. मात्र डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि उपचारासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे तिला नवजीवन मिळाले.
एका निष्पाप जीवाला मृत्यूच्या दारातून परत आणून तिला तिच्या कुटुंबाच्या कुशीत सुखरूप पोहोचविणे ही केवळ वैद्यकीय सेवा नव्हे, तर माणुसकीची मोठी जबाबदारी होती.
दीपिकाच्या उपचारासाठी योगदान देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 🙏🌹
दीपिकाच्या नव्या आयुष्याला मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🌼





