Homeघोडेवाहीतेंदूपत्ता व्यवहारात दोन कोटींचा घोटाळा; सावलीचा ठेकेदार जेरबंद.

तेंदूपत्ता व्यवहारात दोन कोटींचा घोटाळा; सावलीचा ठेकेदार जेरबंद.

ज्वाला न्यूज 

फसवणूकप्रकरणी सावलीतील ठेकेदाराला अटक; दुसरा आरोपी फरार, पश्चिम बंगाल पोलिसांची कारवाई

 

घोडेवाही (सावली ) : तेंदूपत्ता खरेदीच्या व्यवहारात सुमारे दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सावली तालुक्यातील घोडेवाही येथील तेंदूपत्ता ठेकेदार रोशन दुधे याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी पिंकू दुधे फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

२०२३ च्या तेंदू हंगामात घोडेवाही येथील रोशन दुधे आणि पिंकू दुधे या ठेकेदारांनी पश्चिम बंगाल येथील गंगा एंटरप्राइजेसचे प्रतिनिधी हबीबूर रेहमान एम.डी. बद्रुल हक यांच्यासोबत करार केला होता. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातून तेंदूपत्ता खरेदी करून देण्याचा व्यवहार ठरला होता.

 

करारानुसार बद्रुल हक यांनी रोशन दुधे यांना ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम दिली. मात्र, तेंदूपत्ता दुसऱ्याच ठेकेदाराला विकल्याचे समोर आले. त्यामुळे घेतलेली रक्कम परत न केल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

 

याप्रकरणी बद्रुल हक यांनी पश्चिम बंगाल पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पश्चिम बंगाल पोलिसांचे पथक ३० जुलै रोजी सावली येथे दाखल झाले आणि रोशन दुधे याला अटक केली. त्याच्यावर भादंवि कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

 

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी पिंकू दुधे फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून

तपास सुरू आहे.

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular