Homeगडचिरोलीपोलिसांच्या हेलिकॉप्टरमुळे पुरग्रस्त भागातील नागरिकाचा जीव वाचला.

पोलिसांच्या हेलिकॉप्टरमुळे पुरग्रस्त भागातील नागरिकाचा जीव वाचला.

ज्वाला न्यूज 

गडचिरोली, दि. ३१ : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत लाहेरी येथील ३५ वर्षीय श्यामसुंदर नरेटी यांची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने त्यांना तातडीच्या उपचारांची आवश्यकता निर्माण झाली. रस्ते वाहतुकीचे सर्व मार्ग बंद असल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी तात्काळ समन्वय साधून ‘पवन हंस’ हेलिकॉप्टरद्वारे त्यांची सुखरूप सुटका केली.

 

हेलिकॉप्टरच्या मदतीने श्यामसुंदर नरेटी यांना गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

या संपूर्ण बचाव मोहिमेत गडचिरोली पोलीस, जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग तसेच पवन हंस हेलिकॉप्टरचे पायलट व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करत वेळेत रुग्णाला उपचारासाठी पोहोचवले. या धाडसी आणि समन्वयपूर्ण कार्यामुळे एका नागरिकाचा जीव वाचल्याने संबंधित यंत्रणांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अतिवृष्टीच्या काळात कोणतीही आपत्कालीन आरोग्य समस्या उद्भवल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा.असे आवाहन पोलिस अधीक्षक एम.रमेश यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular