ज्वाला न्यूज
गडचिरोली – मुनिश्वर बोरकर
गडचिरोली – पद्मभूषण श्री अण्णासाहेब हजारे प्रणित लोक आंदोलन न्यास गडचिरोली तर्फे सोनम वांगचुक व विद्यार्थ्यांचे नीट चे पेपर फुटी संदर्भात दिल्ली येथील जंतर मंतर वरती सुरू असलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन विद्यार्थ्याच्या रास्त मागणीची पूर्तता करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोक आंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ खरवडे आलापल्ली आणि लोक आंदोलन न्यासचे जिल्हा उपाध्यक्ष रवी भाऊ सेलोटे व इतर समितीच्या सदस्यांनी इशारा दिलेला आहे लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये आपण वावरतो तेव्हा शासन प्रशासनात कुठे चूक होत असेल आणि जनतेला योग्य न्याय मिळत नसेल तर लोकशाहीच्या मार्गाने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्या करिता संविधानिक अधिकारा नुसार आंदोलन करण्याचे सर्व भारतीयांना संविधानिक अधिकार आहेत नुकतेच नीट चे पेपर फुटल्याने प्रामाणिक व अभ्यासू विद्यार्थ्या वरती अन्याय झाल्याचे दिसून येत आहे आज शासन प्रशासनात पारदर्शकता दिसून येत नाही आणि लोकशाहीमध्ये दडपशाही हुकूमशाही मनमर्जीपणा होताना दिसत आहे या देशाची जनता मालक असून कर्मचारी व अधिकारी हे जनतेचे नोकर आहेत व जनतेमधून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे आज नीट पेपर फुटी मुळे देशभरात आपल्या सरकारची नाचक्की झालेली आहे देशभरातील विद्यार्थी पालक वर्ग व जनतेमध्ये असंतोष असून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक समाजसेवक सोनम वांगचूक यांनी रास्त मागण्या घेऊन दिल्लीमध्ये जंतर-मंतर वरती आमरण उपोषण सुरू केले आहे आज त्यांचे 20 ते 22 दिवस होऊन सुद्धा कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही सरकारने आंदोलनाची सकारात्मक दक्षता न घेतल्यास गडचिरोली येथे लोक आंदोलन न्यास च्या वतीने तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल असे लोक आंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ खरवडे यांनी या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांना निवेदनाद्वारे म्हटले आहे





