ज्वाला न्यूज
गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज
*कुरखेडा: -* दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शाळेच्या पहिल्या दिवसा निमित्ताने तसेच लेखक विद्यार्थांच्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत मूळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी कुरखेडा तालुक्यात येणाऱ्या जामटोला येथील जि.प. प्रा.शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी मनमोकळ्या पणाने संवाद साधला. अंगी असलेल्या कला,गुणांच्या माध्यमातून माणूस येशाचा शिखर गाठू शकतो. अंगी असलेल्या कलागुणांना महत्व देणे गरजेचे आहे.तुम्ही आजचे नवागत उद्याचे भविष्य आहात म्हणून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शाळेच्या पहिल्या दिवसा निमित्ताने विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य , भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सोबतच शाळेला काही पुस्तके व आपला सर्व परिचित असलेला झाडीबोली काव्यसंग्रह “झाडीचा खाजा” शाळेला भेट म्हणून दिला. मुख्याध्यापक महेश जांभूळकर यांनी सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचा विद्यार्थ्यांना परीचय करून देताना म्हणाले की, संगीता ठलाल या दुर्गम भागातील असताना सुद्धा वाचनाच्या माध्यमातून आज त्या साहित्यिक बनल्या ,त्यांनी स्वतः च्या आत्मविश्वासावर समाजात ओळख निर्माण केली तसेच समाजासाठी कार्यरत असतात ही खरंच अभिमानाची बाब आहे. आपणही त्यांच्या कडून खूप काही शिकू शकतो. सोबतच शिक्षिका रेखा शंभरकर यांनी सुद्धा संगीता ठलाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मुख्याध्यापक जांभूळकर यांनी संगीता ठलाल शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्ताने आमच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले म्हणून शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी जामटोला येथील पोलीस पाटील रेखा दखणे, शिक्षिका शंभरकर ,शाळेचे मुख्याध्यापक जांभूळकर तसेच विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.





