Homeचंद्रपूरचंद्रपूर बनस्थानकाच्या २०० मीटर परिसरात नो पार्किंग झोन.

चंद्रपूर बनस्थानकाच्या २०० मीटर परिसरात नो पार्किंग झोन.

ज्वाला न्यूज

गडचिरोली संपादक मंगेश बन्सोड

चंद्रपूर: राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या दोनशे मीटर परिसरात नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.६ ते १५ जून या कालावधीत धडक कारवाई केली जाणार आहे.

 

उच्च न्यायालय औरंगाबाद व नागपूर खांडपीठाने अवैध प्रवाशी वाहतुकीबाबत दिलेल्या निकालात राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील क्षेत्र खासगी वाहतूकदारासाठी निषेध क्षेत्र म्हणून जाहीर केले.

 

मात्र, त्यानंतर या आदेशाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व विभागीय पातळीवर ही मोहीम राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे.

 

त्यामुळे आता अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई केली जाणार आहे. चंद्रपूर विभागात सुरक्षा व दक्षता अधिकारी किरण नागमोते यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे.विभागातील अधिकारी,पर्यवेक्षक, आगार प्रशासन आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

चंद्रपूर बसस्थानकासह मुल, घुग्गुस, वरोरा, चिमूर, बल्लारशाह, राजुरा आणि भद्रावती येथील बसस्थानक परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात २०० मीटर नो पार्किंग झोनची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. १५ जूनपर्यंत सुरू असलेल्या या मोहीमेमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी माहिती चंद्रपूर आगाराचे व्यवस्थापक अंकुश खाडीलकर यांनी दिली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular